टीम इंडियाच्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा

टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स आपल्या जीवनसाथी सोबत टूरवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील प्रदर्शन दाखवल्यानंतर स्वत:च्या आयुष्यातील महत्वाचे प्रश्न टीम इंडियाचे खेळाडू सोडवतांना दिसतायत.

Updated: Jun 1, 2015, 09:51 PM IST
टीम इंडियाच्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स आपल्या जीवनसाथी सोबत टूरवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील प्रदर्शन दाखवल्यानंतर स्वत:च्या आयुष्यातील महत्वाचे प्रश्न टीम इंडियाचे खेळाडू सोडवतांना दिसतायत.

टीम इंडियातील एका खेळाडूंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, मुंबई रणजी टीमचा सदस्य असलेला आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीच्या नावाची सध्या चर्चा आहे. धवलने आपली मैत्रिण श्रद्धा खारपुडेसोबत साखरपुडा केला आहे, सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

मुंबई आणि राजस्थानचा त्याचा सहकारी अजिंक्य राहणेने देखिल हे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत.
आपल्या साखरपुड्यानंतर धवलने लिहलं आहे, जी व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्वाची असते, जी व्यक्ती संपूर्ण आयुष्य आपल्यासोबत असेल, तिच्या शिवाय आयुष्यात काहीही महत्वाचं नसेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.