पुणे : इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे. पुण्यामध्ये भारत आणि इंग्लंडचा पहिला सामना होणार आहे. या मॅचमध्ये विराट कोहली पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. या वनडेआधी भारतीय टीमनं जोरदार प्रॅक्टिस केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये युवराज सिंगनं कमबॅक केलं आहे. त्यामुळे युवराजला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान या सीरिजमध्ये असणार आहे.
विराट कोहली (कॅप्टन), एमएस धोनी, के.एल.राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव