आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

Intern Intern | Updated: Apr 8, 2017, 07:22 PM IST
आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी title=

बंगळुरू : आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

बंगळुरूच्या संघातील विराट कोहली आणि एबी. डी. व्हिलियर्स हे दोन मुख्य खेळाडू संघाबाहेर असल्याने संघ काहीसा कमकुवत वाटतो आहे. तसंच दिल्लीच्या संघातील जे. पी. ड्युमिनी आणि क्विंटॅन डिकॉक यांच्या गैरहजेरीमुळे संघ काहिसा असंतुलित दिसतो आहे.

मात्र तरीही झहीर खानच्या नेतृत्वाखाली दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ पर्वातला हा पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

अनेकदा नेतृत्व आणि संघबदल करूनही दिल्लीचा संघ कधीही फायनलपर्यंत पोहचू शकला नाही आहे. तर बंगळुरूचा संघ जवळपास दरवर्षी टॉप ३ मध्ये असतो.