रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या उमेश यादवने जोरदार केली. यादवने टाकलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मॅक्सवेलची बॅटच तुटली.
९१वे षटक सुरु असताना उमेश यादवने पहिला बॉल टाकला. मात्र मॅक्सवेलने जेव्हा शॉट खेळण्यासाठी बॅट उंचावली त्यावेळी बॉव बॅटला लागला आणि बॅटचे दोन तुकडेच पडले.
मॅक्सवेलच्या हातात केवळ बॅटचा हँडल राहिला. बॅटचा उडालेला तुकडा पाहून तोही पाहत बसला. यावेळी मॅक्सवेल ८२ धावांवर खेळत होता. यादवने तब्बल १३७ किमी प्रतितास वेगाने बॉल टाकला होता.