रांची : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.
दुसऱ्या दिवशी सामना सुरु होताच ग्लेन मॅक्सवेल (104) रनवर आउट झाला. ऑस्ट्रेलियाचा सहावा आणि और सातवा विकेट जडेजानेच घेतला. ११६ व्या ओव्हरमध्ये तीन बॉलमध्ये २ विकेट घेतले. आठवां विकेट लंचनंतर पडला. जडेजाने नाथन लियोनला नायरच्या हाती कॅच देत ऑस्ट्रेलियाला नौवा झटका दिला.
शेवटच्या विकेट पडू नये म्हणून स्मिथने स्ट्राईक स्वत:कडेच ठेवली होती. जोश हेजलवुडला स्मिथ स्ट्राईक देत नव्हता पण जडेजाच्याच बॉलवर रन घेतांना जडेजाने न बघताच हेजलवुडला रनआऊट केलं.
पाहा व्हिडिओ