नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगमध्ये फ्रंचायझीद्वारे कायम ठेवण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचे मानधन शुक्रवारी जाहीर करण्यात आलेय.
या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक मानधनाच्या यादीत अव्वल स्थान मिळवलंय ते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहलीनं. त्यानं चक्क भारताचा वनडे कर्णधार महेंद्र सिंग धोनीलाही मागे टाकलंय.
विराटला १५ कोटी रुपये मिळतात. तर पुण्याकडून खेळणाऱ्या धोनीचे मानधन १२.५ कोटी इतके आहे. धोनीसह शिखर धवनलाही १२.५ कोटी इतके मानधन मिळते.
चेन्नईवर बंदी घातल्यानंतर आता पुणे संघाकडून खेळणाऱ्या धोनीचा मानधनाच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. धोनी, धवन आणि विराटव्यतिरिक्त रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनाही १० कोटीहून अधिक मानधन मिळते.