नवी दिल्ली : आयपीएलमध्ये खेळाडूंना किती मानधन मिळते, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. आयपीएल २०१६मधील कायम असणाऱ्या खेळाडूंचे मानधन जाहीर करण्यात आलेय.
संघांत कायम असलेल्या खेळाडूंचे मानधन जगजाहीर केले जाईल, असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार आहे मानधन जाहीर करण्यात आलेय.
खेळाडूंच्या रकमचे आकडे बीसीसीआयने जाहीर केलेत. फ्रँचायझींनीने खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रकमेचे आकडे जगजाहीर केलेत. त्यामुळे त्यांच्या मानधनाचा आकडा पाहून धक्काच बसेल.
चेन्नईने गेल्या वर्षी महेंद्रसिंग ढोणी, सुरेश रैना, आर. अश्विन, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा हे पाच खेळाडू संघात कायम राखले होते. त्यांच्यावर लागलेल्या बोलीपेक्षा त्यांना फ्रँचायझींकडून विशिष्ट रक्कम दिली जात होती. आता धोनी पुण्याकडून खेळणार आहे.
शेन वॉर्नला राजस्थान रॉयल्सने गडगंड पैसे देऊन संघात कायम राखले होते. हे माहीत असल्यामुळेच आयपीएलमध्ये किती मानधन मिळते याची उत्सुकता होती.
पाहा मानधन:
डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन): 50000000
मनन व्होरा (किंग्ज इलेव्हन): 3500000
गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स): 100000000
सुनील नारायण (केकेआर): 80000000
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स): 115000002
किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स): 97000000
लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स): 81000000
हरभजन सिंग (मुंबई इंडियन्स): 80000000
अंबाती रायडू (मुंबई इंडियन्स): 60000000
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): 150000000
बी डीव्हिलर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): 95000000
ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): 84000000
शिखर धवन (सन रार्झस हैदराबाद): 125000000
एम एस धोनी (टीम पुणे): 125000000
अजिंक्य रहाणे (टीम पुणे): 80000000
आर अश्विन (टीम पुणे): 75000000
स्टिव्हन स्मिथ (टीम पुणे): 40000000
फाफ डू प्लेसिस (टीम पुणे): 47500000
सुरेश रैना (टीम राजकोट): 95000000
रवींद्र जडेजा (टीम राजकोट): 55000000
ब्रॅन्डन मॅकलमला (टीम राजकोट): 32500000
जेम्स फॉल्कनर (टीम राजकोट): 51000000
ड्वेन ब्राव्हो (टीम राजकोट): 40000000