विशाखापट्टणम : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
पुजाराने सेहवाग स्टाईलने 99 रन्सवर असताना सिक्स मारुन सेंच्युरी पूर्ण केली. राजकोट टेस्टमध्येही पुजाराने सेंच्युरी झळकावली होती. पुजारापाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंही दमदार सेंच्युरी झळकावली. कोहलीची ही कारकिर्दीमधील चौदावी सेंच्युरी आहे. करियरमधील पन्नासाव्या टेस्टमध्ये स्पेशल खेळी करत सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम कोहलीने केलाय. 19 मॅचमध्ये कॅप्टन म्हणून कोहलीची ही सातवी सेंच्युरी आहे.
पुजारा 119 रन्सवर आऊट झाला. कोहली आणि पुजारा यांच्यात तिस-या विकेटसाठी 226 रन्सची पार्टनरशिप झाली. दुस-या टेस्टमध्ये टॉस जिंकत टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल आणि विजय झटपट माघारी परतले. त्यानंतर मात्र कोहली आणि पुजाराने दमदार खेळी करत डाव सावरला.