मुंबई : सेमी फायनलमध्येच भारताचं सलग दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. तत्पूर्वी टीम इंडियाचा वारु सुसाट सुटला होता. यामुळेच यावेळीही धोनी पुन्हा भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटत होता. मात्र, कांगारुंनी सेमी फायनलमध्ये धोनी अॅन्ड कंपनीला चारी मुंड्या चित केलं आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
धोनी अॅन्ड कंपनीचा वारु वर्ल्ड कपमध्ये सुसाट सुटला होता. त्याला लगाम घातला तो चार वेळा वर्ल्ड कपला गवसणी घालणाऱ्या कांगारुंनी... वर्ल्ड कपपूर्वी जी टीम अतिशय सामान्य कामगिरी करत होती ती टीम वर्ल्डकप सुरु होताच तुफान फॉर्मात आली होती. यामुळेच टीम इंडिया यावेळीही वर्ल्डकप जिंकणार, अशी आशा वाटू लागली होती. धोनी अॅन्ड कंपनीने सलग सात मॅचेस जिंकत तिसे संकेतच दिले होते. मात्र, सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारखी दर्जेदाज आणि बलाढ्या टीम समोर उभी ठाकली आली टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागला. या वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या कामगिरीचं विश्लेषण केल्यास टीम इंडियाच्या बॉलर्सने ऑस्ट्रेलिया वगळता सर्वच मॅचमध्ये चांगली कामगिरी केलीय.
दरम्यान, भारतीय बॅट्समनला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.
भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माने ८ मॅचेसमध्ये एकूण ३३० रन्स केले. यामध्ये एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावलेल्या आहेत. त्याने ४७.१४ या सरासरीने या रन्स केले आहेत.
या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक रन्स ४१२ रन्स या शिखर धवनने केल्या. त्याने दोन सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने ५१.५०च्या सरासरीने या रन्स केल्या.
तर विराट कोहलीने ३०५ रन्स केले यामध्ये एका सेंच्युरीचा समावेश आहे. त्याने ५०.८३ च्या सरारीने रन्स केले आहेत.
अजिंक्य रहाणेने ३४.६६ च्या सरासरीने २०८ रन्स केल्या असून एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.
तर सुरेश रैनाने ५६.८० च्या सरासरीने २८४ रन्स केल्या यामध्ये एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
धोनीने ५९.२५ च्या सरासरीने २३७ रन्स केल्या असून यामध्ये दोन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
तर जडेजा केवळ ५७ रन्स करु शकलाय.
भारतीय बॉलर्सवर नजर टाकल्यास...
उमेश यादवने सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या असून ३१ रन्सवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
तर मोहम्मद शमीने ७ मॅचेसमध्ये १७ विकेट्स घेतल्या असून ३५ रन्स देत ४ विकेटस ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
मोहित शर्माने १३ विकेट्स घेतल्या असून ४८ रन्स देत ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
आर. अश्विननंही १३ विकेट्स घेतल्या असून २५ रन्स देत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
तर रवींद्र जाडेजाने ९ विकेट्स घेतल्या असून २३ रन्सवर २ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन दर्जेदाज टीमशी भिडली. पाकिस्तानशीही भारताचा मुकाबला झाला. मात्र, पाकिस्तान टीम फॉर्मात नसून वर्ल्ड कपमध्ये तिला पराभूत करण्याची परंपरा भारताने कायम राखली. बाकी लिंबू-टींबू टीम्सवर टीम इंडियाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेवर टीम इंडियाने दीमाखात विजय मिळवला. मात्र, धोकादायक ऑस्ट्रेलियासमोर धोनी अॅन्ड कंपनीने कच खाल्ली आणि वर्ल्ड कपमधूनच त्यांना पॅक अप करायला भाग पडलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.