www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्वत:चं फेसबुक स्टेटस अपडेट ठेवणाऱ्या आणि इतरांच्या अपडेटसवर लक्ष ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे... कारण, आता तुमच्या मोबाईलवर फेसबुक अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही.
सरकारी मोबाईल कंपनी असणाऱ्या ‘बीएसएनएल’च्या युझर्सना ही सुविधा लवकरच उपलब्ध होऊ शकणार आहे. यामध्ये फेसबुक अपडेटस् पाहण्यासाठी तुम्हाला नेट प्लान अॅक्टीव्ह करण्याची काहीच गरज नाही. केवळ फेसबुक अपडेटसची सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला एका दिवसासाठी तीन रुपये, एका आठवड्यासाठी १० रुपये आणि महिन्याभरासाठी २० रुपये मोजावे लागतील.
ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी बीएसएनएलनं युटोपिया मोबाईलशी (U2opia Mobile) हातमिळवणी केलीय. त्यामुळे नेट प्लान अॅक्टीव्ह न करता तुम्हाला फेसबुक स्टेटस अपडेट करणं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता. यूएसडी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं हे शक्य होणार आहे. आपण आपल्या मोबाईलवर प्री-पेड बॅलन्स चेक करण्यासाठी * आणि #च्या मध्ये एक विशिष्ट नंबर वापरतो, हेदेखील यूएसडी तंत्रज्ञानामुळेच शक्य होतं.
सध्या, बीएसएनएलची ही सुविधा पूर्व आणि दक्षिण झोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलीय. पश्चिम आणि उत्तर झोनमध्येही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीनं दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.