www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
`गुगल`ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक आपले स्मार्टफोन ४.२.२ या अत्याधुनिक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम आवृत्तीसाठी अपग्रेड करतील त्यांना प्रायव्हसीला (फोन क्रमांकांची यादी, लोकेशन) मुकावं लागेल. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशन संकेतस्थळाचे संचालक पीटर इकर्सली यांनी गुगल कंपनीच्या अजब स्पष्टीकरणावर आक्षेप घेतला. `गुगलनं आपल्या ग्राहकांकडून खाजगी प्रदान करणारं तंत्र काढून समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नाही.
स्मार्टफोनला अधिक सुरक्षित ठेवणं सोडून त्यांनी चक्क खाजगी यंत्रणाच काढली, हे चुकीचं आहे. `इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशन हे संकेतस्थळ तंत्रज्ञान ग्राहकांच्या हक्कासाठी लढणारं एक आघाडीचं संकेतस्थळ असून `गुगल`संदर्भात सर्वप्रथम यांनीच ही माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोन ग्राहक आपले अँड्रॉईड स्मार्टफोन ४.२.२ याकडं अपग्रेड न करता खाजगी माहिती खाजगी ठेवू शकतात.
मात्र, असे ग्राहक `गुगल`च्या सुरक्षिततेला पात्र ठरणार नाहीत. म्हणजेच विविध `थर्ड पार्टी` अँप्लिकेशन वापरताना सुरक्षितता बाळगता येणार नाही. जगात ८१ टक्के स्मार्टफोन एकट्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळं ही चिंतेची बाब समजली जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.