www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
खरंतर महिला नेहमीच त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी ‘डेटिंग’ करण्यास प्राधान्य देतात तर पुरुष त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या महिलांशी डेटिंग करण्यास उत्सुक असतात. पण ऑनलाईन डेटिंगवर केलेल्या संशोधनाने हे विधान खोटं पाडलंय.
या संशोधनानुसार, महिला या त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या पुरुषाशी ऑनलाईन डेटिंग करणे पसंत करतात. टाईम मॅगझीनने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळून आलंय की, पुरुष आणि महिला ऑनलाईन डेटिंगसाठी कमी वयाच्या साथीदारांना प्राथमिकता देतात. ‘न्यूयॉर्क डेली न्यूज’च्या रिपोर्टनुसार या संशोधनात साधारण ३० ते ४९ वयोमर्यादा असलेल्या ३५,४९२ लोकांच्या प्रोफाईलचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात असं आढळून आलं की, पुरुषांच्या तुलनेत महिला त्यांच्यापेक्षा कमीत कमी पाच वर्षे लहान असलेल्या पुरुषांशी ऑनलाईन डेटिंग करणं पसंत करतात. ३० ते ४९ वयाच्या २६,४३४ पुरुषांमधील ४२ टक्के पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसोबत डेटिंग करणं पसंत नाही. मात्र, अशा महिलांचा प्रस्ताव ते अमान्यही करत नाहीत. तसंच २२ टक्के लोक असेही आहेत जे जास्त वय असलेल्या महिलांच्या प्रस्तावाला काहीच प्रतिक्रिया देत नाहीत.
२०१० मध्ये प्रकाशित केलेल्या जनरल सायकॉलॉजीमध्ये असं म्हटलयं की, ज्या महिलांच्या साथीदाराचे वय त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी अधिक असते त्यांचे नातेसंबध खूप चांगले टिकतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.