www.24taas.com, झी मीडिया,
ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, असा सॅमसंग गॅलेक्सी टॅबथ्री लॉन्च झाला आहे. अँन्ड्रॉईड ४.२ जेलीबीनवर चालतो. ७ इंच १०२४×६०० पिक्सलचा रिझोल्युशनचा डिस्प्ले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी टॅबथ्री हा दोन प्रकारांमध्ये येतो. वायफाय आणि थ्रीजी, १ जीबी रॅमसह १.२ गिगाहटर्झ ड्युअल कोअर प्रोसेसर आहे.
८ जीबी इंटरनर्ल स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएस-डी कार्डने ३२ जीबीपर्यंत वाढवता येवू शकतं. २ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आहे. बऱ्याचदा आपण फोटा काढतो.
क्लिकच टायमिंग चुकतं आणि तो क्षण मात्र आपण पकडू न शकल्याची खंत राहते. जेव्हा स्माइल कराल, तेव्हा क्लिक होईल, असं स्माइलचं शूट फिचर याच्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचसोबत पॅनारोमा शूट ज्यामुळे लॅण्डस्केपचा वाइड अँगल व्युव्ह घेता येतो. सॅमसंग गॅलेक्सी टॅब थ्री फ्रंट कॅमेरा नाही.
कनेक्टीव्हीटी ऑप्शन्संमध्ये वायफाय, डायरेक्ट वायफाय, मायक्रो-युएसबी, जीपीएस/एजीपीएस आणि थ्रीजी सीम सपोर्ट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार आठ तासांची ३६००mAh बॅटरी आहे.
आकाराने सॅमसंग गॅलक्सी टॅबथ्री १९३.४ ×११६.४×९.७ एमएमचा असून ३१०ग्रॅम वजनाचा आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी टॅबथ्रीमध्ये नेमकं काय आहे
- अँन्ड्रॉईड ४.२ जेलीबीनवर
- ७ इंच १०२४×६०० पिक्सलचा रिझोल्युशनचा डिस्प्ले
- आठ तासांची ३६००mAh बॅटरी
- २ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा
- कनेक्टीव्हीटी -वायफाय, डायरेक्ट वायफाय, मायक्रो-युएसबी, जीपीएस/एजीपीएस
- ८ जीबी इंटरनर्ल स्टोरेज, मायक्रोएस-डी कार्डने ३२ जीबीपर्यंत वाढवता येवू शकतं
- आकार १९३.४ ×११६.४×९.७ एमएम, वजन ३१०ग्रॅम
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.