www.24taas.com, झी मीडीया, मुंबई
स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगले आणि स्वस्त फोन बनविण्यात जशी स्पर्धा सुरू झाली आहे. एन्ड्रॉइड बाजारात सॅमसंग, मायक्रोमॅक्स, लेनोवो, लावा, झोलोनंतर पॅनसॉनिकने आपले एन्ड्रॉइड फोन बाजारात आणले आहे. या लढाईत आता स्पाइस कंपनीही मागे राहिली नाही. स्पाइसने एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव आहे स्मार्ट फ्लो मेटल ४ एक्स....
स्मार्ट फ्लो मेटल ४ एक्स खूप सारे वैशिष्ट्ये आहेत. यातील खास बात म्हणजे हा फोन ऑनलाइन ४२९९ रुपयांना मिळतो. हा फोन अधिकृतपणे अजूनही भारतात लॉन्च झालेला नाही. त्यामुळे त्याला केवळ ऑनलाइन विकत घेता येतो.
स्मार्ट फ्लो मेटल ४ एक्सची वैशिष्ट्ये
- प्रोसेसर – १ गीगाहर्ट्ज डुअल कोर
- ऑपरेटिंग सिस्टीम – ४.२ जेली बीन
- डिस्प्ले – ४ इंच टीएफटी एलसीडी, ४८०x८०० पिक्सल रेझ्युल्यूशन
- कॅमेरा – ३.२ मेगापिक्सल रिअर, १.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- मेमरी – २५६ एमबी ram
- स्टोरेज – ५१२ एमबी इनबिल्ड, ३२ जीबी पर्यंत वाढता येते.
- बॅटरी – १४५० mAh
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.