www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल हॅन्डसेट उत्पादन कंपनी ‘स्पाईस’नं आपला एक नवा स्मार्टफोन बाजारात दाखल केलाय. ‘स्पाईस स्टेलर ५०९’ नावाचा हा मोबाईल अँन्ड्रॉईड ४.२ वर आधारित आहे.
‘स्पाईस स्टेलर ५०९’ या स्मार्टफोनमध्ये १.३ गिगाहर्टझ् क्वॉड प्रोसेसर (मीडियाटेक) बसवण्यात आलाय. यामध्ये १ जीबी रॅम उपलब्ध आहे तर या स्मार्टफोनची स्टोअरेज कॅपेसिटी आहे ४ जीबी. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत या फोनची मेमरी वाढविता येऊ शकते.
पाच इंचाचा स्क्रिनचं रिझोल्युशन आहे ८५४ X ४८० पिक्सल... या फोनमध्ये थ्रीजी, ब्लू टूथ, वाय-फाय आणि जीपीएस असे अन्य फिचर्सही उपलब्ध आहेत. यामध्ये २००० एमएएचची बॅटरी दिली गेलीय.
या स्मार्टफोनचा ८ मेगापिक्सलच्या रिअर कॅमेऱ्यात ऑटो फोकसचं फिचरही दिलं गेलंय. तर या फोनचा फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सल आहे. रिअर कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश आहे.
या स्मार्टफोनची जाडी आहे ९.५ मिमी... या फोनसोबत कंपनीनं एक फ्लिप कव्हरही दिलंय. परंतु, या वर्गात यापूर्वीच मोटो जी, मायक्रोमॅक्स यूनाईट २ आणि लावा आयरिस एक्स – १ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे ‘स्पाईस स्टेलर ५०९’ टफ फाईट द्यावी लागणार आहे.
पाच इंचाची स्क्रीन असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत आहे केवळ ९,४९९ रुपये. तरी, सध्या रिटेल किंवा ऑनलाईन स्टोअर्समध्ये हाच फोन ८००० रुपयांपर्यंत उपलब्ध होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.