www.24taas.com, मुंबई
तुमच्या ‘व्हॉटस् अप’वर स्टेटस अन अव्हेलेबल दाखवतंय... आणि म्हणून तुम्ही काळजीत असाल तर चिंता सोडून द्या. ‘तुम्ही दहा जणांना मॅसेज पाठवलेला नाही, म्हणून तुमचं व्हॉटस् अप अकाउंट बंद झालेलं नाहीए तर ते सध्या सर्व्हरवर लोड आल्यामुळे थोड्या कालावधीसाठी बंद राहील’, असं कंपनीनं जाहीर केलंय.
‘तुम्हाला व्हटस् अप अकाउंट सुरू ठेवायचं असेल तर दहा जणांना हा मॅसेज फॉरवर्ड करा’ असा मॅसेज मिळाला असेलही... पण तो कंपनीतर्फे अजिबात पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे साहजिकच तुम्हाला नवीन अकाउंट सुरू करायची ना गरज भासणार आहे, ना त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार... असं कंपनीनं जाहीर केलंय. सर्व्हरवर आलेला लोड कमी केला गेला की तुमचं ‘स्टेटस् एरर’ आपोआप गायब होणार आहे. आणि तुम्ही यापुढेही तुम्हाला हवे तितके मॅसेजेस फ्रीमध्ये पाठवू शकणार आहात...
तेव्हा फेक मॅसेजेस ओळखा.... आणि शांत राहून अनावश्य मॅसेजेस पाठवणं टाळा...