फेसबुक, ट्विटरमुळे अनेकांनी गमावली नोकरी

फेसबुक म्हणजे आज तरूणाईचा जीव की प्राण झाला आहे. ती ऑनलाईन आली असेल का, तो आता ऑनलाईन आलाच असेल असं म्हणतं ऑफिस गाठताच पहिले लॉग इन करतात ते आपलं फेसबुक.

Updated: Nov 30, 2012, 10:04 PM IST

www.24taas.com
फेसबुक म्हणजे आज तरूणाईचा जीव की प्राण झाला आहे. ती ऑनलाईन आली असेल का, तो आता ऑनलाईन आलाच असेल असं म्हणतं ऑफिस गाठताच पहिले लॉग इन करतात ते आपलं फेसबुक. आणि त्यामुळे ऑफिसमध्ये फेसबुकवर ऑनलाईन असण्याचं प्रमाण मात्र खूपच वाढलं आहे. पण त्यांच्या याच अतिउत्साहीपणामुळे त्यांना आपल्यी नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे.

स्वत:ची स्तुती व्हावी, असे प्रत्येकाला वाटत असते. तो मानवी स्वभाव आहे. परंतु काही वेळा आपण तयार केलेल्या जाळात आपणच अडकतो, असे म्हटले जाते. आणि याचाच प्रत्यय आज अनेकांना आला आहे.
बॉसशी जवळीक वाढविण्‍याच्या नादात काही लोक बॉसला `फेसबुक रिक्वेस्ट` पाठवतात. बॉसला मित्र बनतात. आणि तेच कर्मचार्‍यांना भोवते. ऑफिसमध्ये कायम फेसबुकवर ऑनलाईन असल्याने अनेक कर्मचार्‍यांची नोकरीवरून सुट्टीही झाली आहे.