लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत. आपल्यातील बहुतेक सर्व जण सध्यातरी ३जी इंटरनेटच वापरत आहेत. पण, तरी जग आता ५जी इंटरनेटपर्यंत पोहोचले आहे. ५जी इंटरनेट हे ४जी पेक्षा तब्बल १०० पटीने जास्त वेगवान आहे. म्हणजेच या स्पीडमुळे एक पूर्ण एचडी फिल्म केवळ ५ सेकंदांत डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.
जगातील काही कंपन्या यावर युद्धपातळीवर काम करतायतय ५जी स्पीड मिळवण्यास यश आले असले तरी ते सर्वांसाठी उपलब्ध करुन देणे हे एक मोठे आव्हान आहे. ब्रिटनच्या सरे विद्यापीठात सॅमसंग आणि फुजित्सूसारख्या बड्या कंपन्या यावर काम करत आहेत.
२०१८ सालापर्यंत ५जी इंटरनेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठीचे तंत्रज्ञान सध्या निर्माण केले जात आहे. यात जपान, चीन, अमेरिका आणि स्वीडनसारख्या देशांतील कंपन्यांनी आपले हजारो कोटी डॉलर्स ओतले आहेत. या देशांमध्येही या शोधाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा आहे. पण, तज्ज्ञांच्या मते २०१९ सालापर्यंत तरी या शोधाचे पेटंट घेता येणार नसल्याने तोपर्यंत ही सेवा सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकणार नाही.