www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.
रत्नागिरी, चिपळूण, कणकवली या ठिकाणी काही गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्यास कायमस्वरूपी थांबे देण्यात येणार आहे. या गाड्यांमध्ये मुंबई एक्स्प्रेस, एर्नाकुलम, वास्को एक्स्प्रेस, कोचुवली एक्स्प्रेस, यशवंतपूर एक्स्प्रेस, एलटीटी एक्स्प्रेस आदींचा समावेश आहे.
कोकण रेल्वे मार्गावर एर्नाकुलम-पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसला चिपळूण, रत्नागिरी येथे तात्पुरते थांबे देण्यात आले आहेत. सीएसटी-मंगलोर सीएसटी एक्स्प्रेसला कणकवली, वास्को एक्स्प्रेसला थिवीम, कोचुवली एक्स्प्रेसला कुमठा, यशवंतपूर एक्स्प्रेसला कारवार, एर्नाकुलम, निझामुद्दीन, मुंबई, यशवंतपूर एक्स्प्रेसला कुंदापुरा आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. हे थांबे प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
कोणत्या गाड्या कोठे थांबणार
1) चिपळूण थांबा - 22149/22150 एर्नाकुलम - पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस
2) रत्नागिरि थांबा - 22149/22150 एर्नाकुलम - पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस
3) कणकवली थांबा - 12133/12134 CSTM - मंगलौर जं . - CSTM एक्सप्रेस
22149/22150 एरनाकुलम - पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस
4) थिविम थांबा - 12741/12742 वास्को - पटना - वास्को एक्सप्रेस
5) कुमठा थांबा - 16311/16312 बिकानेर - कोचुवेली एक्सप्रेस
6) होन्नावर थांबा - 16,516 कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस
16523/16524 यशवंतपूर - कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस
7) बायंदूर थांबा - 16345/16346 लोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
19259/19260 भावनगर - कोचुवेली एक्सप्रेस
8) कुंदापुरा थांबा - 16515/16516 यशवंतपूर - कारवार - यशवंतपुर एक्सप्रेस
12618/12617 एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्सप्रेस
12133/12134 मुंबई सेंट्रल - मंगलौर जं . - मुंबई सीएसटी एक्सप्रेस
9) उडुपी थांबा - 12218/12217 चंडीगढ़ - कोचुवेली - चंडीगढ़ एक्सप्रेस
22149/22150 एरनाकुलम - पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस
10 ) सुरतकाल थांबा -16515/16516 यशवंतपुर - कारवार - यशवंतपुर एक्सप्रेस
11) भटकल थांबा -12133/12134 CSTM - मंगलौर जं - CSTM एक्सप्रेस
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.