१२-१२ कोणी साधला मुहूर्त ?

आजचा १२-१२-१२ चा मुहूर्त साधत विरोधकांनी सरकारच्या नावानं शिमगा केला. ठीक १२ वाजून १२ मिनिटांनी विरोधी पक्षांचे आमदार विधान भवनाबाहेर आले आणि त्यांनी सरकारच्या निषेधात घोषणाबाजी केली. १२-१२-१२च्या निमित्तानं राज्याला लोडशेडिंगमुक्त करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. यात सरकारला अपयश आल्याचा हा आगळा निषेध विरोधकांनी केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, नागपूर
आजचा १२-१२-१२ चा मुहूर्त साधत विरोधकांनी सरकारच्या नावानं शिमगा केला. ठीक १२ वाजून १२ मिनिटांनी विरोधी पक्षांचे आमदार विधान भवनाबाहेर आले आणि त्यांनी सरकारच्या निषेधात घोषणाबाजी केली. १२-१२-१२च्या निमित्तानं राज्याला लोडशेडिंगमुक्त करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. यात सरकारला अपयश आल्याचा हा आगळा निषेध विरोधकांनी केला.
आज १२-१२-१२ या शतकातला हा शेवटचाच जादूई योग. पंचांग शास्त्रातील नियमाप्रमाणे आज विवाहमुहूर्त नाही. तरीही कारी प्रेमी मंडळी १२-१२-१२ या जादूई अंकाच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणारेए. शतकातल्या या शेवटचा योग कसा असेल याबाबत जाणून घेऊयात पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्याकडून
१२-१२-१२ हा दिवस जरी शंभर वर्षांतून येणारा योग असला तरी लग्नासाठी हा शूभ मुहूर्त नक्कीच नाही. भारतीय ज्योतिष शास्त्रानं देखील याला व्यर्ज मानलाय. त्यामुळे मराठी कालमापनाप्रमाणं या दिवसात कुठलाही शुभ मुहूर्त नसल्याची माहिती सोलापूरचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पारंगत ओंकार दाते यांनी दिलीए.

लग्नासाठी १२-१२-१२ हा शूभ मुहुर्त नसला तरी शंभर वर्षांतून येणारा हा दुर्मिळ योग असल्यानं अनेकांना आजच्या दिवशी लग्नाची गाठ बांधण्याचा मोह आवरलेला नाही. १२-१२-१२ चा मुहूर्त साधत अनेक जोडप्यांनी रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वांद्र्याच्या रजिस्टर ऑफिसमध्ये गर्दी झाली होती. हा मुहूर्त साधत बोहल्यावर चढता यावं यासाठी या जोडप्यांनी ब-याच महिन्यांआधी अर्ज केले होते..
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजू१२मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला.