थंडीत `व्हिटामिन डी`च्या गोळ्या निरुपयोगी

थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 7, 2012, 04:45 PM IST

www.24taas.com, वेलिंग्टन
थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालंय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही. लोकांना प्रत्येक महिन्यात विटॅमिन डी चा १००,००० एककात डोस दिल्यानंतर याचा त्यांच्यावर काही परिणाम दिसला नाही. ओटागो विश्वविद्यालयाद्वारा एका अध्ययनात विटॅमिन डी बद्दलचे काही विचार स्पष्ट करण्यात आलेत.
न्यूझीलेंडच्या ओटागो विश्वविद्यालयाचे डेविड आर. मडरॅक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निरोगी प्रौढांवर विटॅमिन डीचे डोस आणि श्वसन नलिका व्हायरल संक्रमण यांच्या होणाऱ्या परिणामाचे अभ्यास केला गेला. अमेरिकन मेडिकल अशोसिएशन जनरलच्या अनुसार हा अभ्यास फेब्रुवारी २०१० ते नोव्हेंबर २०११ पर्यत न्यूझीलंड मध्ये चालू होता.

या अभ्यासात सामील झालेल्या लोकांना सुरूवातीला विटॅमिन डी ३ चे २००,००० एककाचे डोस दिले. यानंतर महिनाअखेरीस याच मात्रेत डोस दिला गेला. एकूण १८ महिने हा अभ्यास केला गेला. संशोधकांनी असा निकाल सांगितला की विटॅमिन डी चा खुराक घेतल्याने श्वसन नलिकेवर होणाऱ्या वायरल संक्रमणावर काही परिणाम होत नाही.