मेष – सद्भावनांकडे आपण परतणार

तुम्ही तुमच्या जीवनातून काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणार आहात. गुरू ग्रहाचे स्थान अनुकूल असल्यामुळे सभोतालच्या लोकांशी संपर्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच आपले लक्ष्य खेळापासून कामाकडे अधिक केंद्रीत होईल.

Updated: Jan 4, 2012, 05:59 PM IST

तुम्ही तुमच्या जीवनातून काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणार आहात. गुरू ग्रहाचे स्थान अनुकूल असल्यामुळे सभोतालच्या लोकांशी संपर्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच आपले लक्ष्य खेळापासून कामाकडे अधिक केंद्रीत होईल. १५ जानेवारीनंतर काही काळ कठीण जाणार आहे. हा कठीण काळ गेल्यानंतर तुम्ही तुमच्य लक्ष्याकडे अधिक वेगाने मार्गक्रमण कराल. काही काळासाठी तुम्ही तुमची उर्जा आणि वेळ वाचवा तो पुढील काळासाठी तुम्हांला उपयोगी पडणार आहे.

मार्चनंतर तुमच्या आरोग्याकडे आणि स्वतःच्या हालचालींकडे अधिक लक्ष द्याल. समाजात तुमची भूमिका अधिक मजबूत होईल. जुलैपर्यंत तुमच्या जीवनात खुलेपणा येईल, फिरस्तीचा आणि नवीन आनंद घेण्याचा हा महिना असणार आहे. तुम्ही तुमच्या पासपोर्टला अपडेट आणि सुटकेसला पॅक करून ठेवा. १९ ऑगस्ट हा पौर्णिमेचा दिवस असल्याने या दिवशी काही नवीन छंद सुरू करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. हा चांगला छंद असेल त्यामुळे त्याला टाळू नका. तसेच एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. ज्या व्यक्तीची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहात आहात. तुमच्या राशीतील गुरू आणि शनी यामुळे जवळच्या व्यक्तींशी काही वादाचे प्रसंग निर्माण होतील. परंतु, एक संतुलीत दृष्टिकोनामुळे तुम्ही तुमच्या साथीदाराला समजून घ्याल.

एप्रिलच्या मध्यावर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कुठे दूर घेऊन जाऊ शकतात. बोल्ड निर्णय घ्या त्याचा तुम्हांला फायदा होईल. या काळात तुम्ही तुमच्या संबंधांना एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाल. २०१२ च्या सुरूवातीला गेल्या वर्षात आलेल्या अडचणींपासून सुटका होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सूकर होईल. तुमच्या राशीवर गुरू, मंगळ आणि बुध यांच्या मजबूत प्रभाव आहे. गेल्या वर्षापासून पाठलाग करणारा नकारात्मक भाग्य या वर्षात बदणार आहे.

Tags: