नवी दिल्ली: आयफोन ६ अॅपलचा सध्याचा सर्वात आवडता स्मार्टफोन सिद्ध होतोय. हा फोन लॉन्च होताच ग्राहकांमध्ये खूप पसंत केला जातोय.
आयफोन ६नं आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे आणि आता लंडनची एक लक्झरी कंपनी गोल्डजिनीनं व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं आयफोन ६ डायमंड आणि गोल्ड बॉडी वॅरिएंट लॉन्च केलाय.
कंपनीनं २४ कॅरेट सोनं आणि डायमंडनं बनलेला आयफोन ६ची लिमिटेड अॅडिशन खास व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं लॉन्च केलीय. या दोन्ही प्रकारांची किंमत १५,३०० डॉलर आणि ३.५ मिलियन डॉलर (२२ कोटी रुपये) आहेत. या फोनच्या किंमती त्यावरील डायमंडवर आधारित आहे.
आयफोन ६चे हे तीन मॉडेल तीन रंगाच्या वॅरिएंटसोबत मिळतील. ज्यात गोल्ड, प्लॅटिनम आणि रोज गोल्डचा समावेश आहे. स्टोन वॅरिएंट्समध्ये कलरफूल डायमंड (व्हाइट, पिंक आणि ब्लॅक) शिवाय एमिराल्ड, रूबी आणि सफायर सारखे स्टोनही लागले आहेत. शिवाय फोनला पर्सनल एन्ग्रेव करण्याचं ऑप्शन पण उपलब्ध आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार गोल्ड आयफोन ६ चे तीन ऑर्डर आतापर्यंत बुक केले गेलेत. ग्राहकांना यासोबत अॅपल इअरपॉड्स आणि USB चार्जर मिळणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.