मुंबई : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने काही गोष्टींपासून सावध असणं गरजेचं आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झालाय. ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन अपडेट करायचं आहे का असं विचारलं आहे. या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. असा मॅसेज आला तर त्याला ओपन करु नका आणि डिलीट करुन टाका.
व्हॉट्सअॅपचं गोल्डन व्हर्जन लीक झालं आहे. हे व्हर्जन फक्त मोठ्या व्यक्ती वापरतात पण आता तुम्ही देखील याचा वापर करु शकता. यामध्ये अनेक फिचर्स आहेत. तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन व्हॉट्सअॅप गोल्ड इन्सटॉल करु शकता. असं या मॅसेजमध्ये लिहिलं आहे.
हा फक्त फसवणुक करणारा मॅसेज आहे. व्हॉट्सअॅपने असं कोणतही व्हर्जन तयार केलेलं नाही. व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंग सुविधा आणली आहे पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
जर तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर 404 Error असं पेज ओपन होतं. यामुळे तुमचं डेटा चोरी होऊ शकतं. यामध्ये हॅकर्सचा हात असू शकतो. त्यामुळे अशा मॅसेजपासून सावध राहण्याची गरज आहे.