गर्लफेंडसोबत ब्रेक अपसाठी 'मोबाईल अॅप'

आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अॅपबद्दल ऐकलं असेल... पण, आता तुम्हाला ब्रेक अप करतानाही मदत करेल असं एक भयंकर अॅप तयार करण्यात आलंय. 

Updated: Jun 24, 2015, 01:19 PM IST
गर्लफेंडसोबत ब्रेक अपसाठी 'मोबाईल अॅप' title=

मुंबई : आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अॅपबद्दल ऐकलं असेल... पण, आता तुम्हाला ब्रेक अप करतानाही मदत करेल असं एक भयंकर अॅप तयार करण्यात आलंय. 

या अॅपची खासियत म्हणजे, केवळ ३७ सेकंदात हे अॅप तुम्हाला तुमच्या डोक्याचा ताप वाढवणाऱ्या तुमच्या गर्लफ्रेंडपासून सुटका करण्यास मदत करेल.

'बिंडर' नावाच्या या अॅपनं केलेल्या दाव्यानुसार, तुम्हाला गर्लफ्रेंडशी ब्रेक अप करायचंय पण, हे बोलून दाखवण्याची हिंमत होत नसेल तर मग हे काम 'बिंडर'वर सोडून द्या. 

हे अॅप पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल काही माहिती मागेल. नाव, फोटो आणि नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर हे अॅप ३७ सेकंदाचा एक ऑडिओ आणि टेक्स्ट मॅसेज स्वत:च तयार करेल आणि तुमच्या गर्लफ्रेंडला 'सेंड'देखील करेल.... आणि मग 'झालं काम तमाम'

त्यामुळे, तुम्हाला ना कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल... ना तिखट गोष्टी ऐकाव्या लागणार... तुम्ही जशी प्रोसेस पूर्ण कराल तसं हे अॅप एक खत्तरनाक किंवा कूल मॅसेज तयार करून तुमच्या गर्लफ्रेंडला पाठवतं... आणि मग साहजिकच नातं संपुष्टात येईल, असा दावा या अॅपच्या निर्मात्यांचा दावा आहे. 

या अॅपमध्ये सद्या दोन उणिवा आहेत... पहिली म्हणजे, हे अॅप सध्या तरी ब्रिटनच्या यूजर्ससाठीच उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे हे अॅप सध्या तरी केवळ पुरुषांनाच उपयोगी पडू शकतं. पण, लवकरच महिलांसाठीही हे अॅप बनवण्यात येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.