हे घ्या! फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन ऐवजी आला दगड!

सध्या ऑनलाइन शॉपिंगचं युग आहे. प्रत्येक वस्तू मग ती इलेक्ट्रॉनिक असो किंवा कपडे अनेक जण ती ऑनलाइन मागवणं पसंत करतात. अनेक नेटिझन्सना ऑनलाइन शॉपिंगचे दररोज भन्नाट अनुभव येत असतात.  तसाच काहीसा अनुभव फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन मागवणाऱ्या एका ग्राहकाला आलाय.

Updated: Nov 2, 2014, 11:47 AM IST
हे घ्या! फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन ऐवजी आला दगड! title=

नवी दिल्ली : सध्या ऑनलाइन शॉपिंगचं युग आहे. प्रत्येक वस्तू मग ती इलेक्ट्रॉनिक असो किंवा कपडे अनेक जण ती ऑनलाइन मागवणं पसंत करतात. अनेक नेटिझन्सना ऑनलाइन शॉपिंगचे दररोज भन्नाट अनुभव येत असतात.  तसाच काहीसा अनुभव फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन मागवणाऱ्या एका ग्राहकाला आलाय.

काही दिवसांपूर्वीच स्नॅपडिलनं स्मार्टफोनच्या जागी साबण पाठवल्याची घटना ताजी असतानाच, आता फ्लिपकार्टनं  
फ्लिपकार्टने स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चक्क दगड पाठवला आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीला हा अनुभव आलाय.

दिल्लीतील त्या ग्राहकानं 'गॅलेक्सी नोट ३'ची फ्लिपकार्टवर ऑर्डर केली होती. शनिवारी डिलीवरी मिळणार होती. डिलीवरी मिळाली, त्यानं बॉक्स उघडला आणि बघतो तर काय? त्यात फोन ऐवजी चक्क दगड ठेवला होता. त्यानं लगेच त्याबद्दल तक्रार दाखल केली, फ्लिपकार्टच्या फेसबुक पेजवरही त्यानं तो फोटो पोस्ट केला. 

याबद्दल फ्लिपकार्टनं आपली चूक मान्य करत संबंधित ग्राहकाची माफी मागितलीय. काही दिवसांपूर्वी टाटांची गुंतवणूक असलेल्या स्नॅपडिलकडून प्रॉडक्ट डिलीव्हरी करताना एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला होता. मुंबईतील एका व्यक्तीनं स्मार्टफोनची ऑर्डर केली. मात्र त्यांना चक्क साबण मिळाली होता. मुंबईत राहणाऱ्या लक्ष्मीनारायण कृष्णमूर्ती यांना हा अतिशय विचित्र असा अनुभव आला. तो त्यांनी फेसबुकवरही शेअर केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.