www.24taas.com, मुंबई
सध्या मुंबईतील अनेक कॉलेज कॅम्पसचा वापर चित्रपटांच्या शुटींगसाठी केला जातो. मात्र आता कॉलेज कॅम्पसमध्ये चित्रपटांचं शुटींग करून मुलांचं नुकसान करणा-या या महाविद्यालयांवर मुंबई विद्यापिठ आता कारवाईचा बडगा उचलणार आहे... बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी मुंबईची कॉलेजेस नेहमीच हॉट डेस्टीनेशन ठरली आहेत. मात्र आता या कॉलेजेसच्या कॅम्पसमधुन कॅमेरा... एक्शन...कटईट हे शब्द गायब होणार आहेत...
कॉलेज कॅम्पसमध्ये चित्रपटांचं शुटींग करून मुलांचं नुकसान करणा-या महाविद्यालयांवर मुंबई विद्यापिठ आता कारवाईचा बडगा उचलणार आहे. सध्या हे शुटींगचं प्रमाण वाढलंय. याबाबत विद्यापिठाकडे तक्रारी आल्यात...यापुढे अश्या महाविद्यालयांना बोलावुन ताकिद दिली जाईल आणि तरीही हे प्रकार थांबले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्या मुंबईतील अनेक कॉलेज कॅम्पसचा वापर शुटींगसाठी केला जातोय... मात्र या शुटींगमुळे कॉलेजची आर्थिग गणितं जुळत असली तरी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं...
मुंबई विद्यापिठाच्या या निर्णयामुळं अनेक कॉलेजेसची आर्थिक गणितं बिघडणार असली तरी मुंबईतीत कॉलेजेस आणि विद्यार्थ्य़ांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय. त्यामुळे कॉलेज कॅम्पसचा वापर विद्यार्थ्यांच्या हितासाठी व्हावा हे अपेक्षीत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताला दुय्यम स्थान देउन आर्थिक गणितं जुळवणा-या महाविद्यालयांना आता सावध व्हावं लागणार आहे... कारण या विषयाबाबत मुंबई विद्यापिठ आता गंभीर झालं आहे.