मुंबई : नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुगलने एक डुडल तयार केलं आहे. नुसरत फतेह अली खान यांचा आज ६७ वां जन्मदिवस आहे.
पाकिस्तानाची निर्मिती होण्याच्या एका वर्षाआधी नुसरत फतेह अली खान यांचा जन्म पंजाबमधील लायलपूर सध्याच्या फैसलाबादमध्ये झाला, १३ ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांचा जन्म कव्वालींच्या घराण्यात झाला.
नुसरत फतेह अली खान यांना ४ बहिणी आणि २ लहान भाऊ होते. त्यांचे वडिल उस्ताद फतेह अली खान साहब हे सुद्धा प्रसिद्ध कव्वाल होते. वडिलांनी नुसरत यांनी पहिल्यांदा तबला शिकवायला सुरूवात केली. मात्र नुसरतने गायनात प्रावीण्य दाखवलं.
नुसरतच्या जादूने सीमा पार केल्या, भारतात त्यांच्या गायकीने आणि कव्वालिने पसंती मिळवली.
'मेरा पिया घर आया...', 'पिया रे-पिया रे...', 'सानू एक पल चैन...', 'तेरे बिन...', 'प्यार नहीं करना...', 'साया भी जब साथ छोड़ जाये...', 'साँसों की माला पे...' या सारखी अनेक गाणी सुपर हिट झाली.
भारतात गायनासाठी जेव्हा त्यांना आमंत्रण मिळालं तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी जावेद अख्तर साहेबांसोबत काम करणार, दोन देशांच्या दोन महान हस्तींनी एक अल्बम यावेळी काढला, संगम. संगमचं सर्वात हिट गाण होतं, आफरीन..आफरीन.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.