फेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील

फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.

Updated: Mar 23, 2015, 10:12 AM IST
फेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील title=

मुंबई : फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.

पैसे पाठवण्यासाठी मॅसेंजरमध्ये असलेल्या चॅटविंडोच्या बाजूला डॉलरचा एक आयकॉन आहे. यावर तुम्ही क्लिक करू शकता, सध्या ही सुविधा फक्त अमेरिकेत सुरू करण्यात आली आहे. 

वापरकर्त्याला आधी अमेरिकेतील बँकेद्वारा जारी करण्यात आलेल्या विसा मास्टरकार्ड डेबिट कार्डला आपल्या अकाउंटला जोडावं लागेल.

मोफस पैसे ट्रान्सफर
ही सुविधा मोफत असणार आहे, डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि मोबाईलवर ही सेवा उपलब्ध असेल. अमेरिकेतील लोकांना गुगलच्या एंड्राएड ऑपरेटिंग सिस्टम आणि एप्पलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्यांसाठी काही दिवसात ही सेवा उपलब्ध होणार आहे.

वापकर्ता यासाठी एक पिन बनवू शकेल, तसेच आयफोनवर पेमेंट करण्यासाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी टच आयडी देखिल बनवता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.