गूगलनं लॉन्च केला स्मार्टफोन नेक्सस ५ एक्स!

गूगल इंडियानं एलजी आणि हुआवेईच्या भागीदारीत आपला नेक्सस फोनची नवीन रेंज लॉन्च केलीय. ज्याची किंमत ३१,९०० रुपयांपासून सुरू होते. अँड्रॉइडचं नवं वर्जन मार्शमालो ६.० वर चालणारा हा फोन नोव्हेंबरच्या सुरूवातीला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 13, 2015, 08:23 PM IST
गूगलनं लॉन्च केला स्मार्टफोन नेक्सस ५ एक्स! title=

मुंबई: गूगल इंडियानं एलजी आणि हुआवेईच्या भागीदारीत आपला नेक्सस फोनची नवीन रेंज लॉन्च केलीय. ज्याची किंमत ३१,९०० रुपयांपासून सुरू होते. अँड्रॉइडचं नवं वर्जन मार्शमालो ६.० वर चालणारा हा फोन नोव्हेंबरच्या सुरूवातीला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

एलजीला या फेस्टिव्हल सिझनमध्ये जवळपास १ लाख नेक्सस फोन विकण्याची आशा आहे. तर हुआवेईनं संख्येविषयी सांगितलं नाही. हुआवेईकडून सांगण्यात आलंय की, आपल्या भागीदारांकडून जवळपास २०,००० ते ३०,००० फोनचे त्यांना ऑर्डर मिळालेत.

आणखी वाचा - मोबाईलपेक्षा स्वस्त मायक्रोमॅक्सचा लॅपटॉप

गूगलचे ग्लोबल संचालक (क्रोम आणि अँड्रॉइड मार्केटिंग) डेविड शॅपिरो यांनी सांगितलं, भारत जगातील सर्वाधिकगतीनं वाढणारी बाजारपेठ आहे आणि आम्ही आपला नवीन नेक्सस फोन इथं लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे की, भारतीय ग्राहक नेक्सस ५ एक्स आणि ६ पीचा खास अनुभव असेल.

एलजीद्वारे निर्मित नेक्सस ५ एक्सच्या १६जीबी वर्जनची किंमत ३१,९०० रुपये आहे आणि ३२ जीबीच्या वर्जनची किंमत ३५,९०० रुपये आहे. तर हुआवेईनिर्मित नेक्सस ६पीच्या ३२जीबी वर्जनची किंमत ३९,९९९ रुपये आणि ६४जीबीची किंमत ४२,९९९ रुपये आहे. 

आणखी वाचा -  आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.