मुंबई : नुकतंच 'गूगल'च्या आयडेन्टिफिकेशन प्रोग्रामची एक चूक झाली आणि या चुकीसाठी गूगलला जाहिररीत्या एका जोडप्याची माफी मागावी लागलीय.
त्याचं झालं असं की, गूगलच्या नव्या फोटो अॅपनं एका कृष्णवर्णीय जोडप्याला 'गोरिला'चा लेबल देऊन टॅग केलं. यावर यामुळे संतापलेल्या जॅकीनं ट्विट करून 'गूगल तू सगळं बिघडवलंस... माझी मैत्रिण गोरिला नाही' असं म्हटलं.
आपली चूक लक्षात आल्यानंतर गूगलनं एक ई-मेल धाडून या जोडप्याची माफी मागितलीय. आपल्या चूकीबद्दल आपल्याला खेद असून याबद्दल आम्ही माफी मागतो, असंही गूगलनं म्हटलंय. शिवाय अशा घटना रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जाईल असंही गूगलनं स्पष्ट केलंय.
गूगलनं नुकतेच काही बदल करत स्मार्टफोनसाठी हे अॅप मे महिन्यात लॉन्च केलं होतं. कंपनीकडून फोटो शोधून काढणं आणि ऑर्गनाईज करणं हे या अॅपचं वैशिष्ट्यं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.