ऑर्कुटनंतर आता जी-टॉक बंद करणार गुगल!

आजच्या बरोबर ६ दिवसांनंतर म्हणजे १६ फेब्रुवारीला गुगल टॉक मॅसेंजर बंद होणार आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स अनेक काळापासून याचा वापर करत होते. त्यामुळे अनेक जणांना हे सोडायचं नाहीय.

Updated: Feb 10, 2015, 06:40 PM IST
ऑर्कुटनंतर आता जी-टॉक बंद करणार गुगल! title=

मुंबई: आजच्या बरोबर ६ दिवसांनंतर म्हणजे १६ फेब्रुवारीला गुगल टॉक मॅसेंजर बंद होणार आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स अनेक काळापासून याचा वापर करत होते. त्यामुळे अनेक जणांना हे सोडायचं नाहीय.

गुगलच्या मते, हँगआऊट अॅपच त्यांचं भविष्य आहे आणि जीटॉक बंद करणं हा योग्य निर्णय आहे. जेव्हा गुगलनं जीटॉकसाठी सिक्युरिटी आणि व्हर्जन सपोर्ट सर्व्हिस देणं बंद केलं, तेव्हापासून जी टॉक बंद होणार असा अंदाज होता. यापूर्वी गुगलनं आपली सोशल नेटवर्किंग साइट ऑर्कुट ३० सप्टेंबर २०१४ला बंद केली.

गुगलनं हे स्पष्ट केलंय की, या इंस्टंट मॅसेजिंग सर्व्हिसला हँगआऊट्स अॅप रिप्लेस करेल आणि १६ फेब्रुवारीला जीटॉकचा अखेरचा दिवस असेल. खरं तर हँगआऊट आतापर्यंत जास्त लोकांना आवडंला नाहीय. मात्र हे अॅप फोन-टॅबलेट-पीसी या सगळ्यावर सहजपणे उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.