अर्जेंटीना : भारतात ताज महल हे प्रेमाचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. जगात आणखी एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाचं प्रतिक समजली जाते.
अर्जेंटीनामधील pedro Martin Ureta ने देखील त्याच्या पत्नीसाठी असंच काही तरी केलं होतं. पण त्याने कोणतीही इमारत नाही तर स्वत: एक बगीचा तयार केला होता.
७० च्या दशकात पेडेरो त्याच्या पत्नी ग्रेसीलासोबत असा निर्णय घेतला की, त्यांच्या मुलासाठी असं काही तयार करायचं की सगळं जग ते ळक्षात ठेवेल.
पण एका आजारामुळे त्याच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर त्याच्या पत्नीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेडेरोने त्याने कमावलेलं सगळं काही फुलाच्या बागेवर खर्च केलं. ज्याच्या आकार गिटार सारखा आहे.
गिटार पेडेरोच्या पत्नीला खूप आवडायचा. यामुळेच त्याने बगीचाचा आकार हा गिटार सारखा ठेवला. पेडेरो म्हणतो की, 'तो त्याच्या पत्नीवर आजही तेवढंच प्रेम करतो जेवढं तो आधी करायचा. स्वर्गातून पाहतांना तिला हे गिटार सांगेल की आम्ही अजूनही तिला विसरलेलो नाही.'