www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
"शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."
मैत्री म्हणजे एक रोपटं असतं जे जमिनीत पूर्णपणे रुजलेलं असतं वर दिसतं त्याच्या दुप्पट ते जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं. जसा पाण्याचा रंग कोणता याचं उत्तर देता येत नाही, तसंच मैत्रीचं आहे. ती कशी असते, कधी होते कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचंच बंधन राहत नाही.
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
आणि वनवासातही सोबत करणाऱ्या सीतेसारखी||
मैत्रीतही अनेक प्रकार असतात, जसे काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरीत्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. खरंच आपण आई-वडिलांशी जितकं समरस होऊन बोलू शकत नाही, तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मग ही एक अद्वितीय शक्ती मानायला काहीच हरकत नाही.
म्हणूनच आज मैत्री दिनाच्यानिमित्तानं आपल्या मित्र-मैत्रिनींना शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश, खास झी मीडियाच्या वाचक आणि प्रेक्षकांसाठी...
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
"मैत्री म्हणजे नावं असतं, स्वत:मध्ये गजबजलेलं गाव असतं.
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा"
मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत!
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र
दैवानेच लाभतात! – व.पु. काळे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
तुझी माझी जोडी जशी, मुंबई-पुणे-मुंबई
तुझी माझी मैत्री जशी, सूर्याची कोवळी किरणं समुद्रकाठावर खेळणारी
तुझी माझी मैत्री जशी, गवतावरचं पहाटेचं दवबिंदू
तुझी माझी मैत्री जशी, हात-हातात नसला तरी मनानं सतत सोबत चालणारी
ही मैत्री अशीच राहावी...
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जिवनातली
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...
तुझी-माझी मैत्री मनाला वेड लावून जाते
हसता-हसता डोळ्यात अश्रू देऊन जाते
आयुष्यात नेहमीच तू आठवणीत राहशील
तुझ्याविना मैत्री हा शब्दही नेहमीच अपूर्ण राहतो...
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गुंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!
हा धागा नीट नपायचा असतो,
तो कधीच विसरायचा नसतो!
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटावर रंग ठेवून
फुलपाखरं हातून सुटून जातात!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेस