मुंबई : ई आधारकार्डाची PDF फाइल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा पासवर्ड शोधणे खूप कठीण गोष्ट आहे. पण आता हा पासवर्ड शोधणे खूपच सोपे आहे.
आज आपण शिकणार आहोत की ई-आधारकार्डाचे PDF लेटर डाऊनलोड केल्यावर ते ओपन करण्यासाठी पासवर्ड मागण्यात येतो. या ठिकाणी आपण आपला मेल, फोन चेक करतो पण तो पासवर्ड काही मिळत नाही. अनेकांना ही अडचण आलेली असते.
तुम्ही सुरूवातीला आधारकार्डाच्या साइटवर जाऊन ई-आधार कार्डाची प्रक्रिया पूर्ण करतात. त्यात तुमचा एनरोलमेंट आयडी, तुमचे संपूर्ण नाव, पीन कोड, आणि मोबाईल नंबर टाकतात. त्यानंतर मोबाईलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येतो. तो तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये येतो. ओटीपी मिळाल्यावर तुम्ही एक PDF आधारकार्ड लेटर डाऊनलोड होते.
हे लेटर ओपन करण्यासाठी पासवर्ड मागितला जातो, त्यावेळी पासवर्ड दुसरा तिसरा कोणता नसून तुमचा पीन कोड असतो. उदा. डोंबिवलीचा पीनकोड ४२१२०२
यानंतर ही PDF फाइल ओपन होते. त्या फाइलचे रंगीत प्रिंट आउट घेऊन तुम्ही ओरिजनल आधारकार्डाप्रमाणे वापरू शकतात. तसेच विविध योजनांचा फायदा घेऊ शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.