मुंबई : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा उशिरा लागण्याची शक्यता आहे.
कनिष्ठ कॉलेजच्या प्राध्यापकांचे गेल्या एक आठवड्यांपासून असहकार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर झालाय.
बारावीच्या परीक्षेच्या ७० लाख उत्तरपत्रिकांपैकी २ लाख पेपर तपासले गेले आहेत. बारावीची परीक्षा संपत आली तरी अद्याप या आंदोलनाबाबत काही तोडगा निघालेला नाही. दोन दिवसांत यावर कोणताही तोडगा निघाला नाही तर निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.