मुंबई : भारतामध्ये असे अनेक स्मार्टफोन प्रेमी आहेत ज्यांची पहिली पंसती आयफोन असते. अशा ग्राहकांच्या गरज पूर्ततेसाठी चिनी कंपनी हुआवेई आता पुढे सरसावली आहे. आयफोनला टक्कर देण्यासाठी हुआवेईने भारतात हॉनर 4x आणि हॉनर 6 प्लस असे दोन स्मार्टफोन लॉंच केले आहेत.
हॉनर 4xची किंमत १०,४९९ रुपये आहे, तर हॉनर 6 प्लसची किंमत २६,४९९ रुपये आहे. हॉनर 6 प्लसमध्ये ५.५ इंच स्क्रीन, एलटीपीएस डिसप्ले, फूल HD रिझ्यूल्यूशनसह हिसीलकॉन ९२५ ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. या फोनमध्ये ४.४ किटकॅट, ३ जीबी रॅम तसेच १६, ३२, ६४ मेमरी स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. या मोबाईलमध्ये ८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनचं वजन १६५ ग्रॅम असून जाडी ७.५ मिमी आहे.
हॉनर 4x मध्ये १.२ जीएचझेड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१२ क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो अॅन्ड्रॉईडवर आधारित आहे. हा डुएल सिम फोन असून त्यात २ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनला ५.५ इंच इतकी स्क्रीन देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.