तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार फेसबूक

आपल्या आयुष्यातील भूतकाळातील गोष्टींना उजाळा देण्याचं महत्वाचं साधन म्हणजे फोटो. हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक या सोशल साइडने आपण आपले जुने फोटो, पोस्ट नव्या तऱ्हेने पाहू शकू यासाठी एक नवीन फिचर फेसबूकवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 27, 2015, 02:31 PM IST
तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार फेसबूक title=

मुंबई : आपल्या आयुष्यातील भूतकाळातील गोष्टींना उजाळा देण्याचं महत्वाचं साधन म्हणजे फोटो. हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक या सोशल साइडने आपण आपले जुने फोटो, पोस्ट नव्या तऱ्हेने पाहू शकू यासाठी एक नवीन फिचर फेसबूकवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

'ऑन दिस डे' असे या फिचरचे नाव असून याचा वापर आपण www.facebook.com/onthisday या लिंकवर जाऊन करू शकता. याच्या मदतीने आपण भूतकाळात त्या दिवशी फेसबूकवर काय पोस्ट केलं, काय शेअर केलं तसेच आपल्या फोटोंना कोणी या दिवशी टॅग केलं या गोष्टी पाहता येतील
 
अजून तरी ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नाही. न्यूज फीडच्या डाव्या बाजूला असलेल्या बुकमार्कद्वारे आपण याचा वापर करू शकता. तुम्ही मागील तारखेच्या पोस्ट नोटीफिकेशनद्वारेही मिळवू शकता. येत्या काही काळात ही सुविधा जगभरात उपलब्ध होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.