मुंबई : अॅपलनं काही दिवसांपूर्वी वॉटरप्रूफ तंत्रज्ञानाचे पेटंट केले होते. त्यामुळे वॉटरप्रूफ आयफोन ग्राहकांना मिळेल अशी चर्चा होती. आयफोन ७ हा वॉटरप्रूफ असेल का ? अशी माहिती तरी अजून कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
आयफोनच्या विविध कनेक्टरला आच्छादन करतानाच वॉटरप्रूफिंगसाठी विशिष्ट तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. सेल्फ हिलिंग मटेरिअलच्या रूपात रबरचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक कनेक्टरच्या ठिकाणी पाणी शिरणार नाही, याची काळजी घेणारे हे तंत्रज्ञान आहे.
३ जीबी रॅम आणि ५.५ इंचची स्क्रिनचा आयफोन ७ स्मार्टफोन ग्राहकांना वापरायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.आयफोन ७ मध्ये वायफाय ऐवजी लायफायचं फिचर देण्यात आलं आहे. आयफोनच्या आधीच वॉटरप्रूफ तंत्रज्ञान सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी सिरीजमधील मोबाईलसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पेटंटच्या स्पर्धेत वॉटरप्रूफ तंत्रज्ञानासाठी तरी सॅमसंगने बाजी मारलेली आहे.
आयफोन ७ चा लूक कसा आहे. त्यासाठी पाहा हा व्हिडिओ