नवी दिल्ली : भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी 'माइक्रोमॅक्स'नं आज आपला पहिला वहिला फोर जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'कॅनव्हास एक्सप्रेस ४ जी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे.
माइक्रोमॅक्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बाजारात फोर जीचीच चलती आहे. त्यामुळे, माइक्रोमॅक्सचाही फोकस आता फोर जी गॅझेटसवरच असेल. ऑनलाईन माध्यमातून आज ४० टक्के फोर जी स्मार्टफोन विकले जात आहेत.
ऑनलाईन विक्री आणि कमी किंमत ही माइक्रोमॅक्सची स्ट्रॅटर्जी आहे. त्यामुळे, आता हळूहळू कंपनी टूजी फोन बनवणं बंद करणार आहे.
आजपासून हा फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झालाय. यामध्ये एक गीगाहर्टझ मीडियाटेक एमटी ६७३५ प्रोसेसर आणि २ जीबी डीडीआर ३ रॅम उपलब्ध आहे.
पाच इंचाचा डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यामध्ये १६ जीबीचं इंटरनल स्टोअरेज उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन केवळ ६,५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.