नवी दिल्ली : तुम्ही जर आयडिया यूजर्स आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भारतातील टेलिकॉम कंपनी आयडिया मोबाईल डेटा पॅकच्या दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्जिन सुधारण्यासाठी कंपनी हा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे.
पुढील काही आठवड्यात याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ स्पेशल स्कीमअंतर्गत ३० दिवसांच्या एक जीबी डेटा पॅकसाठी आता आयडिया १२३ रुपये आकारत आहे. या किंमतीत वाढ होऊन ती १५० पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
नुकतीच आयडियाने कोलकातामध्ये थ्रीजी सर्व्हिससाठी स्वत:चे 2100MHzचे स्पेक्ट्रम बँड लावण्याची घोषणा केली.