नवी दिल्ली : प्रेमासाठी लोक काय नाही करत. एक असे चित्रकार आहेत जे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी दिल्लीवरुन स्वीडन पोहोचले तेही सायकलवरुन. यांचे नाव आहेय प्रद्युम्न कुमार महानंदिया. यांची प्रेमकहाणी एखाद्या बॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशीच आहे. मात्र ही कथा नव्हे प्रत्यक्ष जीवनातील कहाणी आहे. त्यांचा जन्म १९४९मध्ये ओडिशाच्या बुनकर दलित कुटुंबात झाला. दलित असल्याने त्यांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला. शाळेतही त्यांना वेगळ्या ठिकाणी बसावे लागत असे. त्यांच्या वडिलांनी लहानपणी भविष्यवाणी केली होती की प्रद्युम्नकुमारचे लग्न दुसऱ्या देशातील मुलीशी होईल.
त्यांना चित्रकलेची आवड होती. दिल्लीत कॉलेज ऑफ आर्टसमध्ये शिक्षण घेत असताना ते कनॉट प्लेस येथे लोकांचे पोर्ट्रेट बनवत असत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिली महिला अंतराळवीर वेलेंटिना टेरेस्कोवा यांनी त्यांच्याकडून पोर्ट्रेट बनवून घेतले आहे. यानंतर त्यांची पोर्ट्रेटर म्हणून ओळख वाढायला लागली. १९७५ मघ्ये शॉर्लेट नावाची स्विडीश विद्यार्थ्यी कॅनॉट प्लेस येथे आली आणि तिने प्रद्युम्न यांना पोर्ट्रेट बनवण्यास सांगितले. तिला पाहताच प्रद्युम्न यांना वडिलांची भविष्यवाणी आठवली.
प्रद्युम्न यांनी शॉर्लेट यांचे पोर्ट्रेट बनवले. त्यानंतर तिच्याशी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. या दोघांनी विवाहही केला. शॉर्लेट यांचा व्हिसा संपल्याने त्यांना स्वीडनला माघारी परतावे लागले. काही दिवसांनी पत्नीला भेटण्याची इच्छा प्रद्युम्न यांची झाली. मात्र पैसे नसल्या कारणाने ते विमान प्रवास करु शकत नव्हते. त्यांनी त्यांच्याजवळील सर्व सामान विकले आणि एक जुनी सायकल विकत घेतली. या सायकलीवरुन ते दिल्लीवरुन स्वीडनसाठी रवाना झाले. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सायकलवरुन इराण, तुर्की, अफगाणिस्तान, बुल्गारिया, जर्मनी आणि ऑस्ट्रिया देशांच्या सफरीनंतर ते स्वीडनच्या सीमेवर दाखल झाले. मात्र इमिग्रेशन व्हिसा नसल्याने त्यांना सीमेवर रोखण्यात आले. प्रदुयम्न यांनी त्यांच्या लग्नाचे सर्टिफिकेटही दाखवले. अखेर प्रद्युम्नने शार्लेटशी त्या अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली. त्यानंतर दोघांनी स्वीडन कायद्यानुसार पुन्हा लग्न केले. आता प्रदुयम्न हे स्वीडन नागरिक असून प्रतिष्ठित पेंटर अशी त्यांची ओळख आहे. त्यांना सिद्धार्थ नावाचा मुलगा आणि मुलगी एम्लीही आहे. हे दोघेही ओडिशाला येत जात असतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.