www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मल्हारमध्ये अनुभवायची ती बेधुंदी, प्रत्येक क्षणाची एक्ससायटमेंटला, क्रिएटीवीटीला भरभरुन दाद आणि नवनव्या आयडियांना सलाम… मल्हार अवघ्या तीन दिवसांचाच असतो. पण या तीन दिवसांत तो भरपूर काही देऊन जातो. तो आनंद, ती ऊर्जा पुढचा मल्हार येईपर्यंत कायम राहते.
पुण्याच्या एका कॉलेजमधून सिद्धी पोतदार आणि तिचा ग्रुप आलेला आहे.कॉमर्सच्या दुस-या वर्षाला शिकत असलेल्या सिद्धीला क्लासीकल आणि वेस्टर्न असे दोन्ही डान्स जमतात. आणि तिच्या ग्रुपलाही डान्सची धुंदी आहे. पुण्याहून खास मल्हारचा अनुभव घेण्यासाठी ही टोळी ४ दिवसांसाठी मुंबईला आली आहे.
जिथे अफलातून परफॉरमन्स सादर केले जातात असा मल्हारचा फेमस स्ट्रिट डान्स इवेंट याच स्पर्धेत या ग्रुपने मुंबईच्या इतर ८ पार्टीसीपंट्सना टक्कर दिली. त्यांना स्पर्धा जिंकायची नव्हती तर फक्त मल्हारच्या वेगळेपणाचा अनुभव घ्यायचा होता.
हीच तर खासीयत आहे मल्हारची... दिल्ली, बँग्लोरवरुन विद्यार्थी फक्त इथली धम्माल पाहण्यासाठी येतात. अशी काय नशा आहे या फेस्टिवलमध्ये, काय वेगळेपण आहे या मल्हारचं...
फेस्टिवलसाठी वर्षभर प्लॅनिंग करावं लागतं. फेस्ट येण्याआधी 6 महिने त्याची तयारी करावी लागते. मल्हार सुरु होईपर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना रात्री झोप येत नाही तर इथे येणा-यांना कॉलेज सुरु होताच प्रतिक्षा असते ती मल्हारला जाण्याची...पण फेस्ट सरु होताच अवघ्या तीन दिवसात मल्हारला अलविदा करावं लागतं.
पण जाता जाता मल्हार या यंगीस्तानला खूप काही देऊन जातो. त्यामुळेच जे यावर्षी राहून गेलं ते पुढच्या वर्षी मल्हारमध्ये नक्की करायचं याच प्लॅनिंगने मल्हारचा शेवट होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.