www.24taas.com झी मीडिया, मुंबई
झेवियर्सचा मल्हार आता 35 वर्षांचा झाला आहे. अनेक कॉलेजमध्ये वेगवेगळे फेस्टिवल्स रंगतात. पण मल्हार म्हणजे फेस्टिवल्सचा राजाच जून,जुलै महिना आला की झेवियर्सच्या नसानसात हा मल्हार भिनत जातो. अथक प्रयत्न, अफाट प्लॅनींग, आणि तगडं इवेंट मॅनेजमेंट यांच्याच जोरावर मल्हार उभा राहतो.
ही सगळी एनर्जी मल्हारमध्ये ओसंडून वाहत असते. अनेक स्पर्धा रंगतात पण त्या जिंकण्यासाठी नाही तर या क्राउडची वाहवा मिळवण्यासाठी, बट इट्स नॉट इजी बॉस...यासाठी प्रचंड प्रॅक्टीस आणि त्यासाठी रात्रीचा दिवस करावा लगतो.
अशाच टॅलेंट्सना संधी मिळावी यासाठीच `मल्हार`ने जन्म घेतला. १९७८ साली मुंबईतल्या या शानदार कॉलेजमध्ये मल्हार फेस्टिवलची धुम सुरु झाली. मल्हार यशस्वी करण्यासाठी झेवियर्सच्या विद्यार्थ्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही. हळूहळू हा फेस्टिवल तरुणांनाच नव्हे तर देशभरातल्या बड्य़ा हस्तींना आकर्षित करत गेला.कॉलेजिअन्सचा सबसे फेवरेट झाला. जरा हटके झाल. सेलिब्रिटींनी हजेरी लावली. इतकच नाही तर तरुणांना विनामुल्य प्लॅटफॉर्म मिळवुन देणा-या या फेस्टिवल्सचा खर्च नामांकित ब्रॅन्ड्स उचलू लागली आहे.
वर्ष सरत गेली तसा मल्हारचा ट्रेंडही बदलत गेला. तरुणांची चॉईस बदलली, त्यांची फॅशन बदलली पण झेवियर्सच्या विद्यार्थ्यांचया जोष आजही ताजा आहे. अगदी स्पॉन्सरपासून ते स्पर्धांचे विषय, त्यांची जागा, त्यांचे जज, त्यासाठीचा क्राउड हे सगळं हे विद्यार्थीचं हँडल करत असतात. मल्हारचे टी शर्ट्स,बॅचेस,प्रत्येक स्पर्धेसाठी वेगळा ग्रुप हे विद्यार्थ्यांवर आहे.
यंदा मल्हारची धुरा १२०० विद्यार्थ्यांवर आहे. गेटपासून ते कॅम्पस, कॅन्टीन, कॉमन रुम जिकडे जिकडे या विद्यार्थ्यांची फौज तैनात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.