मुंबई : मानवता काय असते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ 'मावा केक'. हा व्हिडिओ काही फार उत्तम कलाकृतीचा नमुना आहे अशातील गोष्ट नाही. परंतु, यात व्यक्त होणाऱ्या भावना हृदयाला भिडतात.
आपल्या आवडत्या ठिकाणी मावा केक खायला गेलेले एक आजोबा. तिथला वेटर, एक बालकामगार, हातून पडलेल्या केकची जमवाजमव करणारे आजोबांचे हात आणि रेस्टॉरंटचा दिलदार मालक यांच्या संबंधांची ही कहाणी तीन मिनिटांत फार कलात्मक पद्धतीने उमलते.
ही कहाणी संपते तेव्हा डोळ्यांत आसू आणि चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहात नाही. तुम्हीच पहा ही कहाणी.