मुंबई : मुंबई आणि दिल्लीत एकट्या माणसाला घर भाड्याने न देण्याचा निर्णय अनेक हौसिंग सोसायट्या घेत असतात. मुंबईत एकट्या माणसाला घर भाड्याने मिळतं, मात्र दिल्लीत अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र अशी कोणती कारणं आहेत, की दिल्लीत आणि मुंबईत काही ठिकाणी बॅचलर्सला घरं भाड्याने देणे नाकारतात.
१) खूप दारू पितात - जास्तच जास्त वेळेस बॅचलर्स मुलं आणि मुली एकत्र आल्या की त्या खूप दारू पितात. गोंधळ घालतात, गाणी लावतात, याचा शेजाऱ्यांना त्रास होतो, आणि तक्रारी घर मालकापर्यंत पोहोचतात.
२) भाडे मिळण्याची चिंता - मुंबईत ९० टक्के ठिकाणी अकरा महिन्याचं घर भाडं आगाऊ घेतात, म्हणून घरं भाडं मिळण्याची तेवढी चिंता नसते, पण दिल्लीत दर महिन्याला घर भाडं मागितलं जात असल्याने, बॅचलर्स वेळेवर घर भाडं देत नसल्याची तक्रार आहे.
३) घरात साफ सफाई ठेवत नाहीत - अनेक घर मालकांची अशी धारणा आहे की, बॅचलर्स घरात साफ सफाई ठेवत नाहीत, तेव्हा अनेक वेळा घर मालक त्यांना घर साफ ठेवण्याचे टोमणे मारत असतात.
४) प्रेम प्रकरण - तुम्ही भाडं देत असलेल्या घरात तुम्ही तुमच्या महिला किंवा, महिला घरात राहत असेल, तर पुरूष मित्राल न आणण्याचं तसं अलिखित असतं. तुमची महिला अथवा, महिला राहत असलेल्या रूममध्ये, तुमचा पुरूष मित्र जरी एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी आला, तर शेजारी त्याच्याकडे डोळे ताणून पाहतात, असा बॅचलर्सचा अनुभव आहे.
मुंबईत घरमालकापेक्षा सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनाच अशा प्रकरणांवर आक्षेप असल्याचं दिसून येतं. मुंबईत बऱ्यापैकी याबाबतीत घर मालकाचा फारसा आक्षेप दिसत नसल्याचं एका बॅचलर्सने सांगितलं. मुंबईत महिला किंवा पुरूष मित्राला भेटायचं असेल, तर सीसीडी सारख्या महागड्या ठिकाणी भेटावं लागत असल्याने, बाहेरची बैठक टाळली जाते.
५) वाईट प्रभाव - एकटे राहणारे दारू पितात, सिगारेट ओढतात याचा मोठा परिणाम सोसायटीतील लहान मुलांवर होतो, असा घर मालकांचा समज असल्याने त्याना घरं देणं टाळतात.
मुंबईत बॅचलर्सना घरमालकांचं यासाठी प्राधान्य
मात्र दिल्लीपेक्षा मुंबईत या उलट स्थिती आहे, अनेक ठिकाणी बॅचलर्सला प्राधान्य दिलं जातं, कारण अकरा महिन्याचा भाडे करार संपला, तरी बॅचलर्स घरावर ताबा बसवतील असा धोका नसतो.
मात्र फॅमिली राहत असलेलं घर ते अकरा महिन्याचा भाडे करार संपल्यानंतर घर सोडतील किंवा नाही, याची शाश्वती अनेक घर मालकांना नसते, म्हणून ते बॅचलर्सना प्राधान्य देतात. कुटुंबातील महिलेचं अनेक वेळा सोसायटीतील महिलांशी भांडणं होतात, त्या तक्रारीही अनेक वेळा घर मालकाजवळ येत असल्याने, त्यांना बॅचलर्स परवडतात.
तुम्ही कुठे नोकरी करतात, काय काम करतात, हे सुद्धा पाहून तुम्हाला घर भाड्याने दिले जाते.