बीजिंग : चिनी अॅप्पल म्हणून प्रसिद्ध असलेला शाओमी या स्मार्टफोन उत्पादन कंपनीचं नाव 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं गेलं आहे. या कंपनीने 2.11 मिलियन स्मार्टफोनची विक्री 24 तासात करण्याचा विक्रम केला.
टेक क्रंच वेबसाइटच्या माहितीनुसार शाओमीचा 'MI fan Festival 2015' नावाचा 12 तासांचा फेस्टीवल आशियातील 7 देशांमध्ये राबविण्यात आला होता. या 12 तासात कंपनीने 2.11मिलियन स्मार्टफोनची विक्री केली होती. यामधून कंपनीने 335 मिलियन डॉलर एवढे पैसे जमा केले होते. या सेलमध्ये जवळपास 38,000 Mi Tv, 7,70,000 स्मार्टफोन अप्लायंसेसचा समावेश आहे. या सेलमध्ये शाओमीने फ्लॅश सेलचा रेकॉर्डसुद्धा मोडला आहे.
शाओमी फॅन डेला भारत, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये राबवण्यात आले होते. शाओमीने ६० मिलियन स्मार्टफोन गेल्या वर्षी विकले होते, हा विक्रीचा रेकॉर्ड १०० मिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.