नवी दिल्ली : चायनाचा अॅपल फोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमी फोनवरील बंद तुर्तास उठवण्यात आली आहे. हा फोन भारतात लॉन्च झाल्यापासून स्मार्टफोनच्या बाजारात एकच खळबळ होती, मात्र बंदीनंतर पुन्हा इतर कंपन्यांचे सुगीचे दिवस येतील असं वाटत असतांना, शाओमीवरील बंदी तुर्तास हटवण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी शाओमी स्मार्टफोन कंपनीला विक्री आणि आयात करण्यात 8 जानेवारीपर्यंत परवानगी दिली आहे.
यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले होते.
पेटंटबाबतचा वाद निर्माण झाल्याने न्यायालयाने शाओमीची आयात आणि विक्री थांबविण्याचे निर्देश भारतातील स्थानिक विक्रेते, ई-कॉमर्स विक्रेती कंपनी फ्लिपकार्ट तसेच केंद्रीय सीमाशुल्क विभागाला दिले होते.
शाओमीने प्रथमदर्शनी इरिक्सन कंपनीच्या आठ प्रकारच्या महत्वाच्या नोंदणीकृत पेटंटचे उल्लंघन केल्याचे आरोप, इरिक्सनने शाओमी कंपनीवर केले होते. तथापि, 8 जानेवारीपर्यंत शाओमी स्मार्टफोनची विक्री आणि आयात करू शकते असे भारत प्रेस ट्रस्टकडून ट्विट करण्यात आले आहे.
परंतु शाओमी फक्त फ्लिपकार्टवरुनच स्मार्टफोनची विक्री करू शकते. तसेच भारतात शाओमीच्या ‘रेडमी नोट‘ची विक्री आणि आयात करण्यात बंदी घालण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.