मुंबई : स्मार्टफोन अथवा टॅबलेटवर यू-ट्यूब व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंड वाढला आहे. हा व्हिडीओ पाहतांना अनेक अडचणी येतात.
काही शॉट कीज तुम्हाला सांगतोय, त्यामुळे तुमचं मोबाईल आणि टॅबलेटवर यू-ट्यूब व्हिडीओ पाहणं होणार आहे सोपं.
यू-ट्यूबच्या शॉट किज्
व्हिडीओ पाहतांना तुम्हाला जरा वेळ थांबायचं असेल, तर K दाबा.
व्हिडीओचा आवाज बंद करायचा असेल, तर M दाबा.
स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर फोटो फूलस्क्रिन पाहायचा असेल तर F दाबा.
कंम्प्यूटरवर यू-ट्यूबचा व्हिडीओ फूल स्क्रीन पाहायचा असेल तर F11 दाबा.
जर तुम्हाला यू-ट्यूब व्हिडीओ ५ सेकंद मागे घ्यायचा असेल तर J दाबा.
जर तुम्हाला यू-ट्यूब व्हिडीओ ५ सेकंद पुढे घ्यायचा असेल तर L दाबा.
जर तुम्हाला व्हिडीओ पुन्हा पाहायचा असेल तर O (ओ) दाबा.
जर तुम्हाला १० मिनिटाच्या व्हिडीओचे समान भाग करून पाहायचं असेल, तर एकपासून नऊ पर्यंत तुम्ही ज्या भागाचं दृश्य पाहायचं असेल तो आकडा दाबा, तुम्हाला तिथपासून व्हिडीओ पाहता येणार आहे.
हे शॉट किज् फक्त यू-ट्यूब व्हिडीओसाठी आहेत, इतर व्हिडीओंसाठी नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.