अपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2013, 04:22 PM IST


ओंकार डंके

असिस्टंट प्रोड्युसर
झी मीडिया

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय. देशातल्या राजकारण्यांशी स्पर्धा करणारे राजकारण बीसीसीआयच्या कार्यालयात रंगतय. ज्यांचे केवळ आयुष्य नाही तर पूर्वीच्या सात पिढ्या राजकारणात गेल्यात अशा एखाद्या निगरगट्ट राजकारण्यालाही लाजवेल अशा पद्धतीनं बीसीसीआयचे तात्पुरते पदभार सोडलेले अध्यक्ष श्रीनिवासन यांच राजकारण सुरु आहे. (श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरुन दूर होणे आणि चीनी सैन्यानं लडाखमधून दूर होणं या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. दोघेही हवे तेंव्हा आपल्याला हवी ती ‘पोझिशन’ ताब्यात घेऊ शकतात)
सर्व सभ्य गृहस्थांना मान खाली घालणाऱ्या गोष्टी भारतीय क्रिकेटमध्ये रोज घडतायत. त्याचवेळी इंग्लंडमध्ये आठ अव्वल टीम चॅम्पियन्स करंडकासाठी लढणार आहेत. आजपासून ३० वर्षांपूर्वी म्हणजेच २५ जून १९८३ ला कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमनं बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवत विश्वचषक पटकवण्याचा इतिहास केला होता. ज्या इंग्लंडमध्ये भारतीय टीमनं हा इतिहास रचला त्याच इंग्लंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये विश्वकपाच्या खालोखाल प्रतिष्ठेची समजली जाणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होतीय. भारतीय क्रिकेटच्या सोनेरी क्षणांचे सोबती असलेल्या जून - ८३ या महिन्यानंतर टीम इंडिया ३० वर्षांनी जूनमध्येच इंग्लंडमध्ये एका प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे ३० साल बाद तोच इतिहास परत लिहला जाईल... असं स्वप्न कुणी पाहत असतील तर त्यांनी त्यातून बाहेर पडायला हवं.

आयपीएल स्पर्धेमुळे टीम इंडियाला अनेक खेळाडू मिळाले हे कॅप्टन धोनीचं आवडतं वाक्य आहे. पण आयपीएल नंतर झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाचा बॅँड वाजलाय. आयपीएल नंतर लगेच झालेल्या २००९ आणि २०१० च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सूपर सिक्समध्ये एकही मॅच जिंकता आली नाही. २०११ नंतरच्या आयपीएलनंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तर चार टेस्ट आणि ५ वन-डे नंतरही धोनी ब्रिगेडची पाटी कोरीच होती. हा इतिहास, इंग्लंडमधील आव्हानात्मक हवामान आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरण यामुळे यामुळे भारतीय टीमसमोर एव्हरेस्ट एव्हढं आव्हान उभं राहिलंय. या स्पर्धेत खेळाडूच्या प्रत्येक हलचालींवर संशय रोखणाऱ्या लाखो बोटांचा सामना टीम इंडियाला करावा लागणार आहे.
बॉलिंग ही आपली परंपरागत बोंब या स्पर्धेतही कायम आहे. ज्याचा सध्या सर्वात जास्त उदो उदो केला जात आहे त्या भुवनेश्वर कुमारला फक्त ८ वन-डेचा अनुभव आहे आणि तोही केवळ भारतीय पिचवर. स्वींग खेळपट्यांवर तो धमाल करेलही पण ज्या खेळपट्टीवर बॉल स्वींग होत नाही अशा ठिकाणी तो अगदीच सामन्य बॉलर वाटतो. इशांत शर्माकडे स्विंग आहे, पण सातत्यानं खराब बॉलिंग करण्याची त्याची क्षमता इतकी अफाट आहे, की तो जणीवपूर्वक खराब बॉलिंग करतोय अशी शंका कोणीही घेणार नाही. दुखापतीनंतर परतलेला उमेश यादव, टीमच्या सतत आत-बाहेर असलेला विनय कुमार आणि एखाद्या स्पिनर्सच्या वेगानं बॉलिंग करणारा इरफान या अन्य बॉलर्सक़डनंही मोठ्या अपेक्षा ठेवणं धाडसाचं ठरेल.
भारतीय टीमच्या यशात स्पिनर्सचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहिलाय. फिरकीच्या चक्रव्युहात अडकवणाऱ्या खेळपट्या इंग्लंडमध्ये काही असणार नाहीत. त्यामुळे अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनसमोर मोठं आव्हान असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात हे सर्व स्पिनर्स अपयशी ठरले. चॅम्पियन स्पर्धेतही हेच चित्र दिसू शकतं.
भारतीय टीमच्या बॅटींगचा नेहमीच बोलबाला केला जातो. कागदावर ती नेहमीच बलाढ्य होती आणि अगदी या स्पर्धेतही आहे. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या अनुभवी भारतीय बॅट्समनशिवाय टीम इंडिया पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरतीय. शिखर धवननं मोहलीत तरी झोकात एन्ट्री केली, पण त्यानंतर त्याची कुठेच परीक्षा झाली नाही, आता थेट इंग्लंडमध्ये एक अवघड पेपर त्याला द्यायचा आहे. मुरली विजय हा टीपिकल शो-बाज बॅट्समन. त्यात त्याला हल्ली ब़ॉल्स वाया घालवण्याची मोठी सवय लागलीय. रोहित शर्माची गुणवत्ता ही परमेश्वराच्या अस्तित्वाप्रमाणे आहे. परमेश्वर आहे असेच बहुतेक मानतात. त्याचं अस्तित्वही अनेकांना जाणवंत पण तो कधीही दिसत नाही. रोहितच्या गुणवत्तेचीही